सिल्लोड डोंगरगाव येथे ३२ वर्षाची महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.
शनिवारी पिडित महिला आणि चिमुरडी शेतात गवत आणायला गेल्या होत्या. तेव्हा पासून दोघीही बेपत्ता होत्या. पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.
आज दोघींचा मृतदेह सापडलाय. महिला आणि ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिला फाशी देऊन मारून टाकण्यात आलंय. त्यानंतर विहिरीत फेकून दिलं आहे. शरिरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळल्या आहेत..
सकाळ पासून टीव्ही चालूच आहे. पण या घटनेची बातमी कुठेच दिसली नाही. मागच्या आठवड्यात अश्या दोन घटना वाचण्यात आल्या आहेत. पहिली बारामती जवळील एका गावात ४५ वर्षाच्या माणसाने ७ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला होता आणि गुजरातमध्ये 'आर्टिकल १५' स्टाईल एका मुलीला बलात्कार करून झाडाला लटकण्यात आला होतं.
(या दोन्ही बातम्या माध्यमात कुठेच दाखवल्या नव्हत्या)
माय-लेकीचा तीन दिवसांपासुन पत्ता नव्हता तरीही पोलिसांनी काही काळजी घेतली नाही. पण सगळ्यात वाईट गोष्ट पोलिसांनी केली ती म्हणजे डोंगरगाव पासुन सिल्लोड-औबाद हायवे ला येई पर्यंत २ किमी दोघींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी बाजेवर रस्त्याने चालत आणले ,पोलिसांनी मृतदेहासाठी अॅब्युलेंससाठी सुद्धा सहकार्य केलेलं नाहीये.
जो फोटोमध्ये मुलगा तुम्हाला दिसतोय ना तो बलात्कार झालेल्या महिलेचा मुलगा आहे. आपल्या आई आणि बहिणीच्या पोस्ट मार्टम रिपोर्टची वाट बघत बसलाय. त्याचा कड बघून तुम्हाला थोडंफार जरी काही वाटलं ना तर विनंती आहे या घटनेविषयी पण बोला..
बलात्कार हा बलात्कारच असतो, जात बघून त्याची किंमत ठरतेय हे फार भयाण आहे.
महाराष्ट्र या मायलेकींच्या पाठीशी उभा राहील का ?
😥