प्रत्येक गावातून रक्तदानाची मोहीम सुरुवात व्हावी - जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे
 प्रत्येक गावातून रक्तदानाची मोहीम सुरुवात व्हावी - जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे

March 27, 2020 • संपादक - ईश्वर सुर्यवंशी उदगीर.........


संकटाच्या काळात राष्ट्रहितासाठी रक्तदान करणाऱ्या तरुणांचे कौतुकच.!


प्रत्येक गावातून रक्तदानाची मोहीम सुरुवात व्हावी - जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे


" alt="" aria-hidden="true" />
उदगीर /प्रतिनिधी


करोनाशी आपण दोन हात करतो आहोत. सगळेच आपल्या परिने आम्हाला सहकार्य करत आहेत. मात्र सध्या राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या समाजात आपण राहता त्या समाजाला काहितरी देण्याची वेळ आली आहे. दान द्यायचंच आहे तर मग रक्तदानाशिवाय दुसरे ते श्रेष्ठ काय.?त्यामुळे, नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले आहे.


सध्या आपल्या राज्यात १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. मात्र आपल्या परिने रक्तदान सुरु ठेवा. सामाजिक अंतर राखूनच रक्तदान करा असेही राहूल केंद्रे यांनी सांगीतले आहे.
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला उदगीर तालूक्यातील लोणी येथील तरुणांनी प्रतिसाद दिला आहे. देशावर आलेल्या घातक संकटाच्या काळात गावातील २६ नागरिकांनी एकत्र येत रक्तदान केले आहे. त्यामुळे, राहूल केंद्रे यांनी त्यांचे कौतूक केले व इतर प्रत्येक गावातील तरुणांनी याचे अनुकरन करत न भुतो न भविष्यती असे रक्तदान करावे असे म्हंटले आहे. शिवाय, रक्तदान करताना कोरोनाचा कसलाच धोका निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले आहे. या इश्वरी कार्यात पांडूरंग फड, गणेश पाटील, निखिल पाटील, अतुल पाटील, आदिनी योगदान दिले आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती विजयकूमार पाटील, सरपंच माधव पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


चौकट क्र. १


राष्ट्रहितमे सबकुछ अर्पण, यही हमारा दर्पण..


देशावर सध्या कोरोनाच्या महाभयंकर व्हायरसचे संकट आहे. अशात राष्ट्रहितासाठी सर्वकाही अर्पन केले तरी अपूरे आहे. सध्या रक्ताचा तुटवडा आहे आणि राष्ट्राला रक्ताची गरज आहे. त्यामूळे लातूर जिल्ह्यात रक्तदानाचे महापर्व उभे रहावे. तसेच, समाजाने समाजासाठी काही तरी करण्याची संधी आली असल्याने सर्वानी 'राष्ट्रहित मे सबकुछ अर्पण, यही हमारा दर्पण' म्हणून ईश्वरी कार्यात सहभागी व्हावे.