भाजप खासदार जयसिद्धेश्वर यांना कोणत्याही क्षणी अटक, जात प्रमाणपत्र बनावट प्रकरण

भाजप खासदार जयसिद्धेश्वर यांना कोणत्याही क्षणी अटक, जात प्रमाणपत्र बनावट प्रकरण


Published On :    22 Mar 2020  online


 

भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असून जयसिद्धेश्वर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जयसिद्धेश्वर यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.


 



सोलापूर: भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असून जयसिद्धेश्वर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जयसिद्धेश्वर यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.



जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत सादर केलेलं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं होतं. जात पडताळणी समितीपुढे झालेल्या सुनावणीत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे समितीने जयसिद्धेश्वर यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे शिक्कामोर्तब केले होते. 


 


दरम्यान, बनावट जात प्रमाणपत्र देऊन जयसिद्धेश्वर यांनी निवडणूक यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी अक्कलकोटच्या तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात फिर्याद केली होती. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने जयसिद्धेश्‍वर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याआधारे सदर बाजार पोलिसांनी जयसिद्धेश्वर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

जयसिद्धेश्वर महास्वामींविरुद्ध गुन्हा दाखल करा

दरम्यान, जयसिद्धेश्वर यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असून जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.