गांधीजींच्या हत्येसाठी नथुरामला पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता”


 






“गांधीजींच्या हत्येसाठी नथुरामला पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता”


भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा खळबळजनक खुलासा





आँँनलाइन | February 17, 2020 06:44 



 







राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने पिस्तुलाने गोळ्या झाडून केली. ३० जानेवारी १९४८ ला घडलेल्या या घटनेने सगळा देश हादरला होता. मात्र नथुराम गोडसेला महात्मा गांधींच्या हत्येसाठी पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता होता असा खळबळजनक खुलासा भाजपा खासदा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. एवढंच नाही तर महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन का करण्यात आलं नाही? असाही प्रश्न स्वामी यांनी विचारला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येची नव्याने चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे


बडगे नावाच्या कार्यकर्त्याने नथुराम गोडसेला बंदुक पुरवली होती. हा बडगे हिंदू महासभेत रुजू होण्यापूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. कोर्टातच त्याने तसे म्हटले होते असेही स्वामी यांनी म्हटले आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एकूण दोन ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.


काय आहेत सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केलेले प्रश्न



  • महात्मा गांधींच्या मृतदेहाचं शवविच्छेदन का करण्यात आलं नाही?

  • आभा आणि मनू यांची साक्ष कोर्टात का नोंदवण्या आली नाही? त्या दोघी प्रत्यक्ष साक्षीदार होत्या

  • नथुराम गोडसेकडे जी बंदुक होती त्यामध्ये किती चेंबर रिकामे होते हे तपासले का गेले नाही?

  • इटालियन बनावटीची बंदुक नथुरामकडे कुठून आली? नंतर त्या बंदुकीचं काय झालं?


 


हे चार प्रश्न उपस्थित करुन सुब्रमण्यम स्वामी यांनी महात्मा गांधींच्या हत्येची चौकशी पुन्हा केली जावी अशीही मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी  हे प्रश्न विचारले आहेत. तसंच नथुरामला बंदुक पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता होता असाही खुलासा स्वामी यांनी केला आहे.