राज्यसभेसाठी राष्ट्रवादीतर्फे शरद पवार, फौजिया खान!

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीतर्फे शरद पवार, फौजिया खान!


By ऑनलाइन on Sat, February 29, 2020 3:05am


२६ मार्चला निवडणूक; महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश


मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी राज्यमंत्री फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

२६ मार्चला ही निवडणूक होत असून महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, माजिद मेमन निवृत्त होत आहेत. मेमन यांच्याऐवजी फौजिया खान यांना संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निश्चित केल्याचे समजते.

माझी उमेदवारी पक्की : आठवले
राज्यसभेसाठी भाजपाने आपली उमेदवारी निश्चित केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. विधानभवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते.यामुळे आता भाजपाचा दुसरा उमेदवार उदयनराजे भोसले असतील की संजय काकडे ही चुरस वाढणार आहे. आपण आजच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांनीही आपल्या उमेदवारीस दुजोरा दिला असल्याचे ते म्हणाले.