दिल्ली जळत होती, नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पना पार्टी देत होते

दिल्ली जळत होती, नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पना पार्टी देत होते


Published On :    27 Feb 2020  By : Online


शेयर करा

‘दिल्ली जळत होती, मात्र भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पार्टी देण्यात मश्गुल होते’ अशा शब्दात विदेशी मीडियाने दिल्लीतील हिंसा व ट्रम्प यांच्या दौर्‍यावर कडक ताशेरे ओढले आहेत.



नवी दिल्ली : ‘दिल्ली जळत होती, मात्र भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पार्टी देण्यात मश्गुल होते’ अशा शब्दात विदेशी मीडियाने दिल्लीतील हिंसा व ट्रम्प यांच्या दौर्‍यावर कडक ताशेरे ओढले आहेत.


अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे की, प्रधानमंत्री मोदी किंवा ट्रम्प या दोघांवरही दिल्लीतील हिंसाचार आणि तणावाचा परिणाम झाला नाही. तर दुसरीकडे वॉशिंग्टन पोस्टने या दोन नेत्यांच्या मैत्रीचा मुद्दा उपस्थित करीत असे लिहिले आहे की, मोदींच्या दुष्कर्मात कोणत्याही बाबतीत ट्रम्प यांनी भाग घेऊ नये. दिल्लीच्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर व ट्रम्पच्या अधिकृत भेटीवर अमेरिकन न्यूज वेबसाइट व्हाईसने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. दिल्ली जळत होती आणि मोदी ट्रम्प यांना पार्टी देत होते.


न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात नवी दिल्लीचे रस्ते ‘हिंदू-मुस्लिम संघर्षात बदलले’ असे म्हटले आहे.  मोदींच्या हिंदूधार्जिण्या धोरणामुळे राजधानीत दंगल आणि दोन गट निर्माण झाले. दुसर्‍या लेखात न्यूयॉर्क टाईम्सने लिहिले आहे की, अध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांनी हैदराबाद हाऊसच्या ग्रीन गार्डनमध्ये त्यांची मैत्री साजरी केली. 


आधुनिक, विविधता आणि भारताच्या एकतेबद्दल बोलले. दुसरीकडे, मोदींच्या विभाजनाच्या धोरणांमुळे धार्मिक संघर्ष सुरू होता, त्यामध्ये मृतदेहांचे ढिगारे रचले गेले. दिल्लीत ट्रम्प यांना दिलेल्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर, कट्टर हिंदूंचा जमाव शेजारी राहणार्‍या मुस्लिमांना रस्त्यावर लोखंडी रॉडने मारत होता.


वॉशिंग्टन पोस्टने लिहिले की, ट्रम्प यांनी आपला व्यवसाय वगळता इतर कोणत्याही मुद्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मोदी किंवा त्यांच्या सरकारवर टीका होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून मोदी सरकार हिंदू वर्चस्वाचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


दुसरीकडे ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने म्हटले आहे की, ट्रम्पचा दौरा खतरनाक प्रदर्शनामुळे कमकुवत झाला होता. जर्मनीच्या डेर स्पीगल वृत्तपत्राने म्हटले आहे की, बाहेर दिखावा आत प्रदर्शन होते. फ्रान्स प्रेसने रेड कार्पेट घालून अमेरिकन राष्ट्रपतींना दिखावा करण्यात आला. तशा बर्‍याच गोष्टी भारताने सादर केल्या.  परंतु धार्मिक तणाव निर्माण करून मोदींनी आपले खरे दात दाखवले आहेत असे म्हटले आहे.