ट्रम्पना भारतातील उपासमारी दिसत नाही का?
Published On : 25 Feb 2020 By : ON Line
शेयर करा:
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत वेगानं पुढे जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडत आहे. मोदींच्या गॅस योजनेमुळे सर्वसामान्यांच्या घरातही गॅसवर स्वयंपाक तयार केला जात आहे. अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची भलामण केली.
अहमदाबाद : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत वेगानं पुढे जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडत आहे. मोदींच्या गॅस योजनेमुळे सर्वसामान्यांच्या घरातही गॅसवर स्वयंपाक तयार केला जात आहे. अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची भलामण केली. परंतु देशातील खरी वास्तविकता समोर आलेलीच नाही.
ट्रम्प आणि मोदी या दोघांनीही एकमेकांची खुशमस्करी करत लोकांची फसवणूक केली आहे. भारतातील गरीबी कमी होत असल्याचा साक्षात्कार ट्रम्प यांना कसा काय झाला? आज देशात ८३ कोटी लोक उपासमारीने त्रस्त असताना अशा प्रकारे भलामण करून ट्रम्प यांनी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.
भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे केंद्राचे उद्दीष्ट आहे. तर वास्तविक जीडीपी १.५ टक्केच आहे. अर्थव्यवस्था मजबूत न होण्यामागे गरीबी हा प्रमुख अडथळा आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये ११७ देशांमध्ये भारत १०२ व्या स्थानावर आहे. तर श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तानसारख्या देशात भारताच्या प्रमाणात गरीबी कमी आहे.
म्हणजेच या देशांनी भारताला मागे टाकले आहे. एका बाजूला उपासमारीने जनता त्रस्त असताना मुकेश अंबानींसारख्या बड्या उद्योगपतींची संपत्ती एका दिवसात ४ हजार करोड रुपयांनी वाढत आहे. हा भारताचा असली चेहरा आहे.
जगात अधिक जास्त गरीबी भारतात आहे. आयसीडीएससाठी २ लाख करोडचे बजेट असूनही मुले मरत आहेत. भारतातील गरीबी कमी होत आहे यावर ट्रम्प यांनी भाष्य केले. परंतु गरीबी का आहे यावर त्यांनी चुप्पी साधली. म्हणजेच ट्रम्प यांनीही जाती व्यवस्थेच्या निर्मात्यालाच लपवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात ४ हजारांपेक्षा जास्त लोक उपासमारीने दररोज मरत आहेत. शासक वर्गाच्या नीतीचा हा परिणाम आहे. असे असताना ट्रम्प यांनी मोदींची भलामण करत लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रम्प भारताशी संरक्षण करार करणार असून त्यांचा व्यापारी दृष्टीकोन आहे. कारण भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घ्यायचा एवढाच त्यामागील उद्देश आहे. म्हणून त्यांनी भारताला भेट देऊन मोदींना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसत आहेत.