शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात ---अल्पसंख्याक विकास मंत्री ----नवाब मलिक यांच्या सूचना

-Image result for नवाब मलिक


  *अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या कामकाजाची नवाब मलिक यांनी केली पाहणी * 


अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी विभागाचे संचालक सुनील चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
  अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, सायबर ग्राम योजना, आयडीएमआय योजना,  एस पी एम क्यू योजना तसेच मराठी भाषा फौंडेशन आदी योजनांचा आढावा श्री. मलिक यांनी घेतला. अल्पसंख्याक संचालनालयाच्या वतीने अल्पसंख्याक नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
  दरम्यान, पुना कॉलेज येथे भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन ॲन्ड स्पोटर्स असोसिएशन व पुना कॉलेज यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.