उन्नाव बलात्कार प्रकरणः कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास
Published On : 13 Mar 2020 By :online लोकांची लोकशाही
पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने सुनावली शिक्षा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपने निलंबित केलेला पक्षाचा बलात्कारी आमदार कुलदीप सिंह सेनगर याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवलं होतं. यावेळी न्यायालायने त्याला १० लाखांचा दंडही सुनावला आहे. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवलं होतं.
२०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवलं होतं. बलात्कारप्रकरणी न्यायालयाने त्याला आधीच शिक्षा सुनावली असून सध्या तो जेलची हवा खात आहे. गेल्या आठवडयात या प्रकरणाचा निकाल दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने निकाल जाहीर करत ११ आरोपींपैकी कुलदीप सेनगर व इतर सहा जणांना दोषी ठरवलं. उन्नाव पीडितेच्या वडिलांचा एप्रिल २०१८ मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता