CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही- छगन भुजबळ

CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही- छगन भुजबळ
















1. CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ


नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विषयी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय की, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मी सुद्धा जन्माचा दाखला देऊ शकत नाही.  ही बातमी दिली आहे.


"आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदूंना नागरिकत्व सिद्ध करता आले नाही. मला जर विचारलं की तुमच्या आई-वडिलांचा जन्म दाखला दाखवा, तर ते मी देऊ शकत नाही. तसंच माझ्याकडेसुद्धा खरा जन्म दाखला नसून, घरच्यांनी जबरदस्तीनं शाळेत टाकलं आणि तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी माझी जन्म तारीख स्वत:च्या मनाने टाकून दिली. त्याच्यापलीकडे काहीच नाही," असं भुजबळ म्हणाले यांनी म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते.


ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे CAA बाबत बोलले असतील, पण त्यांनी NRCला पाठिंबा दिला नाही. आमच्या पक्षाचा मात्र या तिन्ही गोष्टींना विरोध आहे. आदिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोक भटकंती करत असतात. त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्रे कुठून येणार?"


2. 'मोदी सरकारने राजकारणावरच भर दिल्याने घसरला अर्थव्यवस्थेचा आलेख'


मोदी सरकारनं फक्त राजकारणावर भर दिल्यानं अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला आहे अशी टीका आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.  ही बातमी दिलीय. लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारनं राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतो आहे, " असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे



.