काय ब्राह्मण विदेशी आहेत? आवाज इंडियाने आयोजित केलेल्या चर्चेत ब्राह्मणांचा पराभव, विलास खरात यांनी केली रविनेश पांडेची बोलती बंद

काय ब्राह्मण विदेशी आहेत? आवाज इंडियाने आयोजित केलेल्या चर्चेत ब्राह्मणांचा पराभव, विलास खरात यांनी केली रविनेश पांडेची बोलती बंद


Published On :    22 Mar 2020  By : online


 

नुकतीच आवाज इंडिया या टीव्ही वाहिनीवर शुक्रवार (२० मार्च) रोजी काय ब्राह्मण विदेशी आहेत? या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये नागपूरचे प्रा.भाऊ लोखंडे, प्रा.विलास खरात आणि रविनेश पांडे यांचा समावेश होता. या चर्चेत प्रा.विलास खरात यांनी ब्राह्मण विदेशी असल्याचे शेकडों पुरावे सादर करत रविनेश पांडे यांचा पराभव केला.




नागपूर : नुकतीच आवाज इंडिया या टीव्ही वाहिनीवर शुक्रवार (२० मार्च) रोजी काय ब्राह्मण विदेशी आहेत? या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये नागपूरचे प्रा.भाऊ लोखंडे, प्रा.विलास खरात आणि रविनेश पांडे यांचा समावेश होता. या चर्चेत प्रा.विलास खरात यांनी ब्राह्मण विदेशी असल्याचे शेकडों पुरावे सादर करत रविनेश पांडे यांचा पराभव केला. यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली. यावेळी आर्य आणि ब्राह्मण वेगळे असल्याचा पांडे यांनी पवित्रा घेतला.



आवाज इंडियावर काय ब्राह्मण विदेशी आहेत? या विषयावरील चर्चेत आर्य आणि ब्राह्मण वेगळे असल्याचे पांडे यांनी सांगितले. यावर खरात सर म्हणाले की हा केवळ शब्दांचा खेळ आहे. मनुस्मृतिमध्ये यांना द्विज म्हटल्या गले आहे. याचा अर्थ दोन वेळा जन्म घेणे होय.एकदा आईच्या उदरातून व दुसरा उपनयन संस्कारातून. 


 


ब्राह्मण विदेशी आहेत हा आजपासून नव्हे तर इंग्रजांच्या काळापासून चर्चेचा विषय राहिलेला आहे. बाल गंगाधर तिळक यांनी सन १९०३ मध्ये ‘आर्टिक होम इन द वेदाज’ या पुस्तकात आर्य हे उत्तर धु्रवाकडून आल्याचा उल्लेख केला आहे. यास देशातील कोणत्याही ब्राह्मणांनी विरोध केलेला नाही. असा टोलाही खरात यांनी पांडेना लगावला.



पुढे बोलताना खरात म्हणाले, जर ब्राह्मणांना असे वाटत असेल की आम्ही इथलेच आहोत, तर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि इंदिरा गांधी यांना पाठविलेले पत्र वाचायला हवे. ज्यामध्ये नेहरुंनी स्वतःला आर्य म्हटले असून ब्राम्हण विदेशी असल्याचे सांगितले आहे. 


 


या पुस्तकात नेहरु म्हणतात, आम्ही लोक जंगली होतो. आम्ही कबील्याच्या रुपाने युरेशियातून पळून भारतावर आक्रमण केले. आम्ही लोकांनी येथील नागांना पराभूत करण्यासाठी हत्याराचा वापर करुन सिंधू संस्कृतीचा नायनाट केला. जेव्हा आम्ही भारतात प्रवेश केला तेव्हा येथे उंच उंच इमारती होत्या. यावरुन सिद्ध होते की आर्याच्या आक्रमणापूर्वी भारतातील सिंधू सभ्यतेचा विकास झालेला होता.



पुढे बोलताना खरात सर म्हणाले, राष्ट्रपिता जोतिराव फुले म्हटले आहे की येथील आर्य ब्राह्मण विदेशी आहेत. फुलेंनी आपल्या काव्यात लिहिले, ‘ब्राह्मणांचेे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून जोती म्हणे.’ यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा शूद्र म्हणून अपमान करण्यात आला. त्यांनीही ब्राह्मणांना विदेशी म्हटले आहे. काय फुले, शाहू, आंबेडकरांचा ब्राह्मणांनी सन्मान केला? असा प्रश्‍नही खरात यांनी उपस्थित केला. 


 


आज ब्राह्मण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले विचार असिमिलेट करून त्याचा प्रचार करतात. यातून ते बहुजन समाजातील महापुरुषांचे ब्राह्मणीकरण करुन बहुजन समाजावर आपले वचर्स्व थोपवतात. यावर पांडे अधिकच चिडले. ते म्हणाले की आर्य आणि ब्राह्मण वेगळे आहेत. ब्राह्मणांची उत्पत्ती आणि आर्याचे आगमण वेगवेगळी बाब आहे.सिंधू नदीच्या किनारी राहणार्‍यांना हिंदू म्हटल्या गेले. त्यांनी हे देखील म्हटले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दुसरी पत्नी ब्राह्मण होती.



पांडे यांनी सविताबाईचा उल्लेख करताच खरात सर म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हत्येत सविताबाईचा हात आहे. त्यांनी गोळवलकर आणि जवाहरलाल नेहरु यांच्या माध्यमातून बाबासाहेबांची हत्या करण्याचे षड्यंत्र रचले. आम्ही यावर पुराव्यासह एक पुस्तक तीन भागात प्रकाशीत केले आहे. ज्यावर एकाही ब्राह्मणाने विरोध दर्शविला नाही. 


 


जर ब्राह्मणांना यावर एतराज असेत तर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे खटखटावे. खरात सर पुढे म्हणाले, चार डिसेबर रोजी बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत जवाहरलाल नेहरु यांच्या विरोधात आवाज उठवत होते. पाच डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत काम करत होते. मग अशी काय घटना घडली की ६ डिसेंबर रोजी त्यांचा आवाज बंद झाला. रेडिओवरुन माहित झाले की ६ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.



पुढे बोलताना खरात सर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूची चोकशी व्हावी, सविताबाईने त्यांची हत्या केली, असे त्यांचे अनुयाई आवळे बाबू यांनी ६ डिसेंबर रोजी आयोजित एका सभेत म्हटले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दोन तासांनी सोडले होते. 


 


यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारतर्फे डीआयजी सक्सेना आयोग स्थापन करण्यात आला. मात्र या चौकशीचा अहवाल आजपर्यत उघड करण्यात आलेला नाही. यातून असे दिसून येते की सिद्धांत, व्यवहार आणि डीएनएच्या आधारे ब्राह्मण विदेशी आहेत.



पुढे बोलताना खरात सर म्हणाले की सन १९५४ ला बौद्धराष्ट्रांसमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘मी बौद्ध धम्म जीवित करणार आहे. ज्यामध्ये ब्राम्हणांना प्रवेश असणार नाही. यावरुन सिद्ध होते की बाबासाहेब आंबेडकर देखील ब्राह्मणांच्या विरोधात होते. 


 


माफीवीर सावरकर यांनीदेखील बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतरावर टीका केली होती. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होेते की बुद्धाचे अनुयाई मोठ्या संख्येने ब्राह्मण आहेत. तुम्ही का शिवीगाळ करत आहात. बुद्धाचे पाच अनुयाईदेखील ब्राह्मण नसल्याचे खरात यांनी सांगितले. यासाठी त्यांनी धर्मानंद कोशंबी यांनी लिहिलेल्या बुद्ध चरित्र या पुस्तकाचा दाखला दिला.



यानंतर त्यांनी लालमणी जोशी यांच्या रिसर्च पेपरचा दाखला देत सांगितले की ब्राह्मणीझम, हिंदूइझम आणि बुद्धिझम या पुस्तकात ब्राह्मण या शब्दाची श्रृती, स्मृती आणि धम्मपदात समान व्याख्या दिसून येत नाही. ज्यांना संस्कृत येते त्यांना ब्राह्मण म्हटले जावे यास विरोध आहे. 


 


पांडे यांनी मोर्य साम्राज्याची स्थापना चाणक्य यांनी केली, असा मुद्दा पांडे यांनी उपस्थित केला. यावर खरात सर म्हणाले की जर चाणक्य इतके महान होते तर सम्राट अशोकांच्या शिलालेखात त्यांचा गुरू म्हणून उल्लेख का आढळून येत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की जो खरा व्यक्ती आहे त्यांचे नाव चापड आहे. यांना मागे सारुण चाणक्यांना समोर करण्यात आले.



यानंतर खरात सर यांनी २१ मे २००१ तसेच राखीगडी येथे मिळालेल्या कंकालचे डीएनए पुरावे सादर केले. त्यांनी सांगितले की यामध्ये ब्राह्मणांचा डीएनए मिळालेला नाही. यामध्ये त्यांचा डीएनए युरेशियातील काळासागर परिसरातील लोकांशी मिळाला. यावर पांडे यांची बोलतीच बंद झाली. ते स्वतःला भारतीय सिद्ध करु शकले नाहीत.