दिल्ली दंगलीचा मास्टरमाईंड कपिल मिश्राला वाय सुरक्षा
Published On : 3 Mar 2020 By : Online
दिल्ली दंगलीचा मास्टरमाईंड भाजपाचा नेता कपिल मिश्रा याला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. कपिल मिश्रासाठी सरकारने पायघड्या अंथरल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न तर होत असल्याची शंका उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली : दिल्ली दंगलीचा मास्टरमाईंड भाजपाचा नेता कपिल मिश्रा याला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. कपिल मिश्रासाठी सरकारने पायघड्या अंथरल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न तर होत असल्याची शंका उपस्थित होत आहे.
मिश्राने चिथावणीखोर वक्तव्य केल्याने दिल्लीत दंगल भडकली. त्याच्यावर भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. या दंगलीत ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेक दुकाने जाळण्यात आली. घरा-दारांना आग लावण्यात आली. यामध्ये अनेक निष्पाप मुस्लीमांना मारण्यात आले.
दरम्यान, मिश्रा याने माझा जीव धोक्यात आहे, आपल्याला धमकावले जात आहे असा कांगावा त्याने केला होता. यानंतर, दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेसाठी पायघड्या अंथरल्या असून त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत मिश्रासोबत ६ सुरक्षारक्षक तैनात असतील. हे सुरक्षारक्षक दिल्ली आणि दिल्लीबाहेर त्याच्या सुरक्षेची काळजी