नागरिकांनो.. घाबरु नका! योग्य ती काळजी घ्या : राज्यमंत्री संजय बनसोडे 
 


नागरिकांनो.. घाबरु नका!
योग्य ती काळजी घ्या : राज्यमंत्री संजय बनसोडे


 


उदगीर : कोरोना व्हायरसला भयभीत न होता, अतिशय सतर्क राहून आपल्याला या संकटाचा सामना करायचा आहे. कोरोना बाबत योग्य काळजी व माहिती घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नागरिकांना केले आहे.



कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा नागरिकांनीही अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व आरोग्य विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. उदगीरच्या पालिकेने शहरातील निवडक रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज केले आहेत.  


नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रसार ‘ड्रॉप’ लेन च्या माध्यमातून होतो. त्यासाठी वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वैद्यकीय सल्ल्यानुसार मास्कचा वापर करावा असा सल्ला राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिला आहे. आपल्या आजूबाजूला एखादा संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास संबंधित विभागाला तात्काळ कळवावे असे आवाहन केले आहे.