कोरोनाच्या आडून संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद शब्द वगळण्याचा डाव
Published On : 28 Mar 2020 By :online lokanchi lokshahi
राज्यसभेतील भाजपाचे खासदार राकेश सिन्हा यांनी मांडला खासगी प्रस्ताव
नवी दिल्ली: SC,ST,NT,VJNT,OBC,SBC यांनि विचार करा. गेली ५०-६० वर्षे सत्तेवर असताना कॉंग्रेसने संविधान संपवलेच त्याच कॉंग्रेसची री ओढण्याचे प्रयत्न होत असून ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचा घाट घातला आहे. आता तर कोरोनाच्या आडून संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद शब्द वगळण्याचा डाव आखण्यात आला असून राज्यसभेतील भाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी तसा खासगी प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे भाजपाचाही संविधानविरोधी मुखवटा पुन्हा एकदा समोर आला आहे.
विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहताना सुरूवातीला धर्मनिरपेक्षता हा शब्दप्रयोग संविधानाच्या प्रास्ताविकेत वापरला नव्हता. परंतु दि. ३ जानेवारी १९७७ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कालखंडात ४२ वी घटना दुरूस्ती करण्यात आली आणि शब्दप्रयोग संविधानाच्या प्रास्ताविकेत आला. काय बाबासाहेबांनी लिहलेले संविधान धर्मनिरपेक्ष नव्हते का? तर त्याचे उत्तर होकारार्थी आहे. मग संविधान धर्मनिरपेक्षता असताना पुन्हा इंदिरा गांधी यांनी धर्मनिरपेक्षता शब्दप्रयोग का वापरला? यामागेही मोठे षड्यंत्र आहे.
आज पुन्हा एकदा देशाचे संविधान कॉंग्रेस व भाजपासारख्या ब्राम्हणवादी पक्षांनी संपवले आहे. कॉंग्रेसचीच री भाजपा ओढत आहे. त्यामुळे दि. ९ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर ११ ब्राम्हणांनी संविधान जाळले तरी सत्ताधारी भाजपाने त्याविरोधात ब्र देखील काढला नाही. याचा अर्थ भाजपाचा त्याला छुपा पाठिंबा होता असेच म्हणावे लागेल.
आता पुन्हा एकदा संविधानातील धर्मनिरपेक्ष शब्द वगळावा यासाठी भाजपाचे राज्यसभेतील खासदार राकेश सिन्हा यांनी खासगी प्रस्ताव आणला आहे. सध्याच्या कालावधीत धर्मनिरपेक्ष हा शब्द निरर्थक आहे. विशिष्ट विचार न करता आर्थिक विचारसरणी मजबूत करण्यासाठी हा शब्द वगळला पाहिजे असा युक्तीवाद सिन्हा यांचा आहे.
धर्मनिरपेक्षता म्हणजे राष्ट्राचा किंवा देशाचा कुठलाही धर्म नाही. आता धर्मनिरपेक्षता शब्द वगळल्यास भविष्यात भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा आरएसएसचा मार्ग मोकळा होईल. हिंदू राष्ट्र म्हणजेच ब्राम्हणांचे गुलाम राष्ट्र होय. या धोक्यापासून लोकांनी सावध होण्याची गरज असून हा प्रयत्न हाणून पाडणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.