मोदींना फटकारल्यानंतर लिसिप्रिया कंगुजम कॉंग्रेसवरही भडकली

मोदींना फटकारल्यानंतर लिसिप्रिया कंगुजम कॉंग्रेसवरही भडकली


Published On :    9 Mar 2020  By : online lokanchi lokshahi


कॉंग्रेसने लिसिप्रियाच्या आडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसने हल्लाबोल करताच लिसिप्रया कॉंग्रेसवरही चांगलीच भडकली.



नवी दिल्ली:  ८ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती लिसिप्रिया कंगुजम सध्या चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने काही प्रेरणादायक महिलांच्या कथा सामायिक केल्या होत्या. त्यामध्ये  लिसिप्रिया देखील होती. परंतु सन्मान स्वीकारण्यास तिने नकार देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना फटकारले होते. त्यानंतर कॉंग्रेसने लिसिप्रियाच्या आडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसने हल्लाबोल करताच लिसिप्रया कॉंग्रेसवरही चांगलीच भडकली.



पर्यावरणीय कार्यकर्ती लिसिप्रिया कंगुजम यांनी सरकारचा सन्मान नाकारून महिला सबलीकरणाबाबतच्या मोदींचा ढोंगीपणा उघड केला आहे. लिसीप्रियाने प्रस्ताव नाकारताना आपला पर्यावरणासंदर्भात आवाज ऐकला जात नाही याची त्यांनी प्रधानमंत्र्यांना आठवण करून दिली होती. माझा आधी आवाज ऐका असे बजावले होते.



लिसिप्रियाच्या आडून कॉंगेसने मोदींवर टीका करताच त्यांनी कॉंग्रेसवर टीकेचा बाण सोडला. तुम्हांला माझ्याबद्दल कळवळा वाटतो. ठीक आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आपले किती खासदार माझ्या मागण्या मान्य करणार आहेत? आपण फक्त ट्विटरवर माझे नाव वापरावे अशी माझीही इच्छा नाही. कोण माझा आवाज ऐकत आहे का? असा सवाल केला आहे.



कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी लिसिप्रियाला प्रत्युत्तर देताना ट्विट केले, तुमचा आवाजच आमचा आवाज आहे. गेली तीन वर्षे मी वायू प्रदूषणाबाबत बैठक घेत आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमध्ये पर्यावरणावर व्यापक चर्चा झाली. आपला मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात नोंदविला गेला आहे. आम्ही त्यावर चर्चा करू. यावर उत्तर देताना लिसिप्रिया यांनी म्हटले, तुमच्या त्वरित उत्तराचे मला कौतुक आहे. परंतु आपण माझे प्रश्‍न आणि वायू प्रदूषण धोरणाबद्दलच्या माझ्या मागणीवर लक्ष हटविण्याचा प्रयत्न करीत आहात.