वामन मेश्राम यांनी पुरातत्व कायद्याच्या जाळल्या प्रती

वामन मेश्राम यांनी पुरातत्व कायद्याच्या जाळल्या प्रती


साकेतच्या मुद्यावरून केंद्र व उत्तर प्रदेश राज्य सरकारला पाठीशी घातल्याने निषेध


पुणे: साकेतच्या मुद्यावरून केंद्रातील भाजपा सरकार व उत्तर प्रदेशातील राज्य सरकारला पाठिशी घातल्याने बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी पुरातत्व कायद्याच्या प्रती जाळून पुरातत्व विभागाचा तीव्र निषेध केला. अशाप्रकारे लक्ष वेधण्यात आल्याने आता तरी पुरातत्व विभागाला जाग येईल का? असा सवाल केला जात आहे.


२१ मे २०२० रोजी अयोध्या परिसरात समतलीकरणाच्या नावाखाली बौध्दस्तूप तोडण्यात आले. त्यासाठी लॉकडाऊनचा सहारा घेण्यात आला. हे बौध्द स्तूप जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. तोडण्यात आलेली बौध्द वास्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पुरातत्व विभागाचा कायदा असूनही कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. 


उलट केंद्रातील व उत्तर प्रदेशातील राज्य सरकारला पुरातत्व विभागाने पाठीशी घातले. ही मोठी दु:खद बाब आहे. पुरातत्व विभागाने कायद्याची अंमलबजावणी केली नाही. समतलीकरण करताना पुरातत्व विभागाने रोखायला हवे होते. या घटनेची चौकशी व्हायला हवी होती. परंतु पुरातत्व विभागाने कानाडोळा केला. याविरोधात देशभरात बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारा गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अशा निष्क्रिय पुरातत्व विभागाचा तीव्र निषेध म्हणून व त्यांचे लक्ष वेधण्यासाठी, कायद्याचे राज्य स्थापित व्हावे यासाठी The Ancient Momuments and Archaeological Sites Remains Act- १९५८ च्या कायद्याची प्रती जाळण्यात आल्या.


मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी विवादित ढाच्याखाली मंदिराचे अवशेष मिळाले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शिवलिंग मिळाले असेही सांगितले. याबाबत सोशल मीडियावर बातम्या आल्या तेव्हा २.७७ एकर विवादित ढाच्याखाली पद्मचिन्ह, अष्टकोन मिळाले. हे सारे बुध्दकालीन अवशेेष आहेत. परंतु पुरातत्व विभागाने खोटा प्रचार केला. लॉकडाऊनच्या कालावधीत क्राईमला पाठबळ देण्यात आले. १९४९ मध्ये के.के. नायरद्वारा बाबरी मशीदच्या गर्भगृहात रात्री १२ वाजता राममूर्ती बसवण्यात आली. ती मूर्ती अयोध्यावरून आणण्यात आली नव्हती तर गोरखपूर येथून आणण्यात आली. हा क्राईम हा नियोजनपूर्वक करण्यात आला आहे


सम्राट अशोक यांनी बांधलेले बुध्द स्तूप तोडण्यासाठी आरएसएस, पुरातत्व विभाग, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांची मिलीभगत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा सहारा घेत त्यांनी साकेतमधील बुध्दस्तूप तोडले. साकेत मुक्ती आंदोलनाची घोषणा होताच ब्राम्हणांना पुरता घाम फुटला. त्यासाठी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व भारत मुक्ती मोर्चा मैदानात उतरला आहे. या आंदोलनाला बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व इतर बहुजन संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशभरात मोठे आंदोलन उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत. केवळ निवेदने देण्यात आलेली नाहीत तर पुरातत्व कायद्याच्या प्रतीही जाळण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उत्तर काय द्यायचे या विवंचनेत ब्राम्हण अडकला आहे.