हाथरसमधील ‘त्या’ तरूणीला न्याय देण्यासाठी बामसेफच मैदानात


हाथरस, बलरामपूर, बुलंदशहर, भदोही या प्रकरणांवर उत्तर प्रदेशसहित देशभरात चरणबध्द आंदोलन, २२ ऑक्टोबर उत्तर प्रदेश बंद, ३० ऑक्टोबर जेलभरो आंदोलन-वामन मेश्राम यांची घोष


चरणबध्द आंदोलन-


३ ऑक्टोबर २०२० उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्ह्यात धरणे प्रदर्शन


८ ऑक्टोबर २०२० देशभरात विशाल धरणे प्रदर्शन


१५ ऑक्टोबर २०२० देशभरात प्रदर्शन रॅली


२२ ऑक्टोबर २०२० उत्तर प्रदेश बंद


३० ऑक्टोबर २०२० जेलभरो आंदोलन


पुणे: हाथरस, बलरामपूर, बुलंदशहर, आझमगड आणि भदोहीसहित अन्य प्रकरणांवर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी उत्तर प्रदेशसहित देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. घोषणा केल्यानंतर ते म्हणाले की, हाथरसच्या मुदद्यावर मी जे म्हणालो होतो की, ते खरे झाले आहे. प्रशासनाने जबरदस्तीने लेटर लिहून घेतले. उत्तर प्रदेश प्रशासनावर त्या तरूणीच्या वडीलांचा विश्‍वास नसल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. यावरून जिल्हाधिकारी नाराज झाले आणि पीडित परिवाराला ते धमकावयला लागले. एवढेच नव्हे तर पीडित परिवाराला घरात कोंडून संविधान कलम क्र.१९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. संविधानाला नख लावण्यात आले. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली. हाथरसमधील त्या तरूणीला न्याय देण्यासाठी बामसेफच मैदानात उतरून लढणार आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, चंद्रशेखर रावण हे हाथरसमध्ये गेले, परंतु त्यांचे केवळ राजकारण आहे. आंदोलन करायचे असेल तर त्या ठिकाणी न जाताही करता येऊ शकते. परंतु राजकारण करून राजकीय पोळी कशी भाजता येईल यासाठी त्यांनी तेथे जाण्याची नौटंकी केली असाही आरोप मेश्राम यांनी केला.


वामन मेश्राम यांनी प्रशासनावर आरोप करताना आरोपींना जेलमध्ये टाकण्याऐवजी पुरावे मिटवण्याचे काम सुरू आहे. एवढा मोठा अपराध होऊनही त्या तरूणीवर बलात्कार झाला नसल्याचे एडीजी म्हणत आहेत. जीभ छाटलेली नाही. परंतु बलात्कारी तरूणीचे टाईम डिक्लेरेशन उपलब्ध आहे. हे देशभरातील मीडियाच्या समोर आले आहे. मेडीकल रिपोर्टमध्ये टाईम डिक्लेरेशनचे महत्व आहे. मेडीकल रिपोर्टमध्ये ज्या बाबी लिहल्या आहेत त्या पोलीसवाले सांगत नाहीत. चौकशीत शुक्राणू मिळालेले नाहीत. केवळ एवढेच सांगितले जात आहे की, ८ दिवसानंतर सँपल केल्यास तर शुक्राणू कसे मिळतील? यावरून सिध्द होते की, योगीचे शासन-प्रशासन पुराव्यांना नष्ट करण्याचे काम करत आहे. आरोपींना वाचवण्याचे काम सुरू आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ठाकूर आणि बलात्कार करणारेदेखील ठाकूर आहेत. त्यामुळे आपल्या जातीला वाचवण्यासाठी ते कामाला लागले आहेत. संविधानाची शपथ घेऊनही संविधानाचे उल्लंघन करत आहेत. या बाबी गंभीर आहेत. यानंतर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या. त्या तरूणीचे पार्थिव कुटुंबाकडे न सोपवणे व परस्पर जाळणे मौलिक अधिकाराचे उल्लंघन आहे. पोलीस प्रशासनाने ऍट्रोसिटी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्या पोलीसांनी परस्पर पार्थिव जाळले त्यांना अटक करावी व त्यांना निलंबित करावे. त्याचबरोबर त्यांच्यावर ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून खटला चालवावा अशी आमची मागणी असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.


दरम्यान एडीजी यांनाही निलंबित करण्यात यावे व त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जावा. डीएम यांनी परिवाराला मदत करण्याऐवजी त्यांना धमकी देण्याचे काम सुरू केले आहे. हे संविधानाचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात ३ ऑक्टोबर उत्तर प्रदेशमधील ७५ जिल्ह्यांमध्ये धरणे प्रदर्शन करत आहोत. याबरोबर ८ ऑक्टोबरला देशभरात धरणे प्रदर्शन होईल. १५ ऑक्टोबरला देशभरात विशाल प्रदर्शन रॅली होईल. २२ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश बंद केले जाईल. त्यानंतर ३० ऑक्टोबरला जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा मेश्राम यांनी केली.