पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही

पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही


Published On : 1 Oct 2020 By 


हाथरस गँगरेप प्रकरण


उत्तर प्रदेश: हाथरस येथील १९ वर्षीय अनु.जातीच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला होता. तसेच तिचा गळा दाबण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे ‘अंतिम निदान’मध्ये बलात्कार झाला आहे याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानेच शविवच्छेदन अहवाल तयार केला आहे. उपचारासाठी पीडितेला अलिगड रुग्णालयातून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालानुसार, मणक्याला फ्रॅक्चर झाला असताना रक्तस्त्रावदेखील झाला होता.


यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असे अहवालात सांगण्यात आले आहे. व्हिसेरा जपून ठेवण्यात आले असून इतर महत्त्वाचे नमुने तपास अधिकार्‍याकडे सोपवण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.