अनु.जातींमधील पुढारलेल्या लोकांनी आरक्षण सोडावं
Published On : 14 Nov 2020
टिनपाट पत्रकार संजय राऊत यांची बेताल बडबड
मुंबई: देशात जातीवर आधारीत आरक्षण असू नये ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं, असं सांगतानाच अनु.जातीतील लोकांना अनेक वर्षांपासून आरक्षण मिळतंय. त्यामुळे आरक्षणामुळे पुढारलेल्या अनु.जातीतील लोकांनी आता आरक्षण सोडलं पाहिजे, अशी बेताल बडबड टिनपाट पत्रकार संजय राऊत यांनी केली आहे
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ‘शट अप या कुणाल’ या युट्यूब चॅनेलसाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी विविध विषयांवर मतं व्यक्त करतानाच आरक्षणावरही आपली भूमिका व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय सरकार घेईल. सध्या हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. पण आरक्षणाबाबत सांगायचं तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही आमची जुनीच भूमिका आहे.
जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही भूमिका आम्हीच मांडली. या देशातील कोणत्याही व्यक्तीला मग तो मुस्लिमही का असेना प्रत्येकाला आर्थिक निकषावरच आरक्षण मिळालं पाहिजे, असं सांगतानाच अनु.जातीतील लोकांनी तर वर्षानुवर्षे आरक्षण घेतलं आणि पुढे गेले. अनु.जातीमधील या पुढारलेल्या आणि आर्थिक सुबत्ता चांगली असलेल्या लोकांनी कधी ना कधी तरी आरक्षण सोडलं पाहिजे, असा बोलघेवडेपणा केला आहे.