देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचेयं, भारत म्हणून नाही
भीमा-कोरेगाव दंगलीचा मास्टर माईंड मनोहर कुलकर्णीने वाजवला हिंदुस्थान नावाचा खुळखुळा
सांगली: या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे असे हिंदुस्थान नावाचा खुळखुळा शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक व भीमा-कोरेगाव दंगलीचा मास्टरमाईंड मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी वाजवला. सांगलीतील एका कार्यक्रमात कुलकर्णीने बेताल वक्तव्य केले.
कुलकर्णी म्हणाले, पद, पैसा, स्थान, मोठेपण हे शुल्लक आहे. आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. हे लक्षात ठेऊन काम करुया. हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकते.
या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. तसेच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल. भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे अशा शब्दात कुलकर्णीने गरळ ओकली
कुलकर्णीने कितीही देशाला हिंदुस्थान म्हणून संबोधायचे प्रयत्न केले तरी ‘इंडिया दॅट इज अ भारत’ हे पहिलेच कलम संविधानात आहे. आपल्या पश्चात ब्राम्हण लोक भारताचे नाव हिंदुस्थान करतील अशी भीती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना होती, म्हणून त्यांनी सुरूवातीलाच इंडियाचे ट्रान्सलेशन भारत असे केले आहे. ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मेख मारली आहे. त्यातून ब्राम्हणांना सुटता येत नाही, त्यामुळे मग शिवसेनेच्या आडून वारंवार भारताचा उल्लेख हिंदुस्थान करून कुलकर्णी नावाचा ब्राम्हण ब्राम्हणवाद मजबूत करण्यासाठीच अशाप्रकारे वक्तव्य करतो अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत