ब्राम्हणांनी संविधान जाळले तेव्हा दातखिळी बसली होती का?
Published On : 29 Jan 2021शेतकरी आंदोलनात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे म्हणणार्या राष्ट्रपतींची भूमिका आपल्या तो बाब्या....दुसर्याचं ते कारटं
नवी दिल्ली: कृषी कायदे फायद्याचे असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अप्रत्यक्षपणे आरएसएसच्या छुप्या अजेंड्याला जाहीर पाठिंबा देत शेतकर्यांना मात्र वार्यावर सोडले आहे. शेतकरी आंदोलनात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला ही बाब खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ज्यावेळी दिल्लीच्या जंतर-मंतरवर ११ ब्राम्हणांनी देशाचे संविधानच जाळले तेव्हा राष्ट्रपती कोविंद यांनी कुठल्याही प्रकारे भाष्य केले नाही, तेव्हा त्यांची दातखिळी बसली होती का? असा सवाल लोकांमधून विचारला जात आहे. यावरून कोविंद यांची भूमिका आपल्या तो बाब्या....दुसर्याचं ते कारटं अशीच आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरू झाले. तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले. सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकर्यांना तात्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकर्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असे कोविंद यांनी सांगत अप्रत्यक्षपणे आरएसएसच्या ब्राम्हणांची भलामण केली.
सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचं पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकर्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते. सरकार खरोखरच आंदोलनाचा आदर करते तर शेतकर्यांवर दडपशाही कशासाठी? त्यांच्यावर लाठीमार कशासाठी? त्यांच्यावर अश्रूधूर कशासाठी? त्यांचे पाणी व वीज कनेक्शन का तोडण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे कोविंद देतील का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
नवीन कृषी कायद्यांची अंमलबजाणी करण्यापूर्वी जी व्यवस्था अस्तित्वात होती. जे अधिकार व सुविधा होत्या, त्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. उलट या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकर्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे, असे कोविंद म्हणाले. शेतकर्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे असतील तर शेतकरी कसा काय विरोध करतील? शेतकर्यांना हे कायदे फायद्याचे अथवा तोट्याचे आहेत हे समजत नाही का? या भाषणात कोविंद यांची भूमिका ही ब्राम्हणधार्जिणी असल्याचेच दिसून आले. त्यामुळे त्यांनी केवळ फेकाकफेक केली आणि शेतकर्यांना फसवण्याचे काम केले अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत