लसीकरण सक्ती विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा मैदानात
लसीकरणाची सक्ती न करण्यासाठी लातूर मनपा आयुक्तांना निवेदन
लातूर : जे विद्यार्थी वॅक्सीनचे दोन डोस घेणार नाहीत त्यांना शाळा महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही अशा प्रकारचा फतवा शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांकडून काढल्या जात आहेत.त्यामुळे संविधानाने जो शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे त्याचे हनन होत आहे. त्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने देशभरातील ५५० जिल्हाधिकार्यांना राज्याच्या मुख्यमत्र्यांना निवेदन दिले. भारतीय विद्यार्थी मोर्चा लातुरच्या वतीने लातुर मनपा आयुक्तांना भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बंडूसिंग भाट यांनी निवेदन दिले.
राज्य सरकारने शाळा महाविद्यालयात प्रवेश केवळ दोन डोस घेतलेल्यानाच मिळेल अशा प्रकारचे परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या निवेदनात म्हटले आहे की, लसीकरण बंधनकारक आहे असे केंद्र सरकार व केद्रींय आरोग्य मंत्रालयाने कुठेही म्हटले नाही तसेच सर्वोच्च न्यायालय व अनेक राज्याच्या न्यायालयाचे आदेश आहेत की, कोवीड १९ लसीकरण बंधनकारक नाही ते एच्छिक आहे. जर बंधनकारक करणार असतील तर नागरीकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन होणार आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चा सुचित करते की, बंधनकारक केलेले लसीकरण तात्काळ प्रसाशनाने रोखावे.
तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे लसीकरण बंधनकारक असल्याचा आदेश दाखवावा किंवा तो भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मेल आयडीवर पाठवावा. लसीकरण केल्यास कोरोना होणार नाही यांची शाश्वती आहे का ? असेल तर सरकारने तसे लिखित स्वरूपात द्यावे. जर लसीकरणामुळे एखादा विद्यार्थी मरण पावल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असे सरकारने लिखित द्यावे.
प्रशासकीय यंत्रणेकडून जे वॅक्सीन बंधनकारक केल्या जात आहे त्यात नेमके कुठले घटक आहेत हे सरकारने लिखित द्यावे. अन्यथा बंधनकारक केलेले हे लसीकरण तात्काळ रद्द करावे व नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे जतन करावे. जर सरकारने हे लसीकरण रद्द केले नाही किंवा आमच्या वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर भारतीय विद्यार्थी मोर्चा संपुर्ण देशभर कोवीड १९ च्या लसीकरणाविरोधात राष्ट्रव्यापी बहिष्कार अंदोलन करेल असा इशाराही निवेदनात दिला आहे.हे निवेदन लातुरच्या मनपा आयुक्तांना देताना बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष दत्ता करंजीकर, बंडूसिंग भाट, प्रकाश लेनेकर, कपील धावड, अभिजित लखमशेट्टे, गंगाराम घोटमुकळे व नवनाथ रेपे उपस्थित होते.